राज्यसेवा परीक्षा 2021 निकालात इम्रान आणि तमन्ना दोघा पती पत्नीची यशाला गवसणी दोघेही बनले अधिकारी.

नुकत्याच राज्यसेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला या निकालात इम्रान शफीक नायकवडी (सातारा समतानगर कॉलनी ) यांनी घवघवीत यश मिळवले

इम्रान नायकवडी यांचे वडिल हे निवृत्त शिक्षक आहेत . कर्मवीर भाऊराव पाटील देवापुर माण जिल्हा सातारा येथून प्राथमिक शिक्षण घेतलेले इम्रान नायकवडी यांनी तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज वारणानगर कोल्हापूर येथून पदवीधर आहेत.  राज्यसेवा परीक्षा 2021 मधून त्यांची Exise Department मध्ये DYSP पदावर नियुक्ती झाली होती.  काल झालेल्या राज्यसेवा परिक्षा 2022 निकालामध्ये असिस्टंट कमिशनर पदावर त्यांची नियुक्ती झाली.

राज्यसेवा निकालामध्ये निवड झालेल्या मूळच्या जंक्शन इंदापूर पुणे येथील तमन्ना हमीद इमानदार ह्या वडिल भारत फोर्स मोटर्स मध्ये नोकरीला असल्याने पुणे तेथे वास्तव्य करतात. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथून B.SC statistics मध्ये पदवीधर आहेत तर मॉडर्न कॉलेज पुणे येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. 2020 च्या राज्यसेवा परीक्षेतून त्यांची नायाब तहसीलदार पदी निवड झाली होती. 

दोघेही पती पत्नी असून दोघांच्या यशाबद्दल मित्रपरिवार यांच्यातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *