वालुर येथील गावठाण मधील सरकारी अतिक्रमण विरोधात आमरण उपोषणाचा तिसरा दिवस .

वालुर ता.सेलु जि.परभणी येथील सर्वे गट नं.479 ही सरकारी गावठणाची प्रतिबंधीत मोकळी जागा बोरी वालुर रोडवरील जिल्हा परिषद प्रशालेच्या पश्चीम दिशेच्या बाजुस आहे तेथे काही खाजगी लोकांनी अवैध रित्या कब्ज़ा करुन तेथे पक्के बांधकाम चालु केले असल्याने शासनाची जमिन हि शासनाच्या वापरात येण्यासाठी राखिव असताना यांना बांधकामाची परवानगी कोणी दिली याची चौकशी करुन जागेची वस्तुनिष्ठ मोजणी करुन संबंधीतांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच तेथील होणारे अतिक्रमण अवैध बांधकाम तात्काळ थांबवण्यात येऊन ती जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व क्रिडा संकुल उभारण्यासाठी राखिव करण्यात यावी हि मागणी मांडून आठ दिवसात प्रकरणी योग्य ती दखल घेऊन कडक कायदेशीर कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदान परभणी येथे दि.15/02/2024 रोजी पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा युवा विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे दि.06/02/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना देण्यात आला होता. परंतु निवेदनावर दखल घेण्यात आली नसल्याचे पाहून दि .15/02/2024 रोजी पासून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनवर दिलावर पठान तडवी, राजाराम आनंदा सिरसाठ, जुबेर खान मन्सुर खान पठान, सोहेल खान लतिफ खान पठान, समीर खान समशेर खान पठान आदि आंदोलन मैदान परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचा आज तीन दिवस झाले आहे.
या आंदोलनास विविध पक्ष संघटना यांनी भेट देऊन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *