
धाराशिव उस्मानाबाद येथील न्यूज टुडेचे संपादक पत्रकार हुकमत मुलानी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची वार्ता मन हेलावून टाकणारी आहे.
पत्रकारिता ही फक्त बातमी सांगण्यापुरती मर्यादित नसते, तर ती लोकांच्या भावना, दुःख, आनंद आणि संघर्ष जनतेसमोर पोहोचवण्याचे माध्यम असते.. हुकमत मुलानी यांनी हे काम अत्यंत प्रामाणिकपणे, धाडसाने आणि संवेदनशीलतेने केले. सर्वसामान्यांच्या मनातील आवाज टिपून तो थेट कॅमेऱ्यातून समाजासमोर मांडण्यात ते पारंगत होते..
त्यांचा नम्र, मनमिळावू आणि प्रामाणिक स्वभाव प्रत्येकाला आपलेसे करून जात असे. आज त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे..
जनतेसाठी लढणारा, सत्याला आवाज देणारा, आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना मंच देणारा आवाज आज कायमचा शांत झाला आहे..
मुलानी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अशा भावना त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केल्या.