काल झालेल्या राज्यसेवा निकालात (Class 1) पिंपरीचा मोहसीन झाला यशस्वी

मोहसीन इलाही शेख पुण्यातील पिंपरी चिंचवडचा रहवासी आहे. त्याचे वडील हे PCMC मध्ये कामाला होते.

2012 मध्ये कॉम्पुटर इंजिीअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि अडीच वर्ष आयटी कंपनी मध्ये काम केलं. 2015 पासून UPSC preparation सुरू केलं व 3 मुख्य परिक्षा दिल्या. 2018 ला त्याची Forest development corporation of Maharashtra (FDCM) मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) म्हणून निवड झाली .

त्यानंतर एमपीएससी राज्यसेवा अभ्यास सुरू केला . २०२०,२०२१ मध्ये जवळून संधी गेली. २०२२ ला पूर्णपणे स्वतःला झुकून दिलं आणि Assistant block development officer म्हणून राज्यसेवा 2022 मध्ये यश प्राप्त केले आहे.

स्पर्धा परीक्षा हे खूप अनिश्चित असे क्षेत्र आहे , म्हणुन ज्यांना आवड आहे अश्या लोकांनीच इथे यावे.

मुस्लिम समाजाचे प्रशासनात प्रमाण नगन्य आहे. त्यमुळे युवक युवतीनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे. एमपीएससी ही पूर्णपणे पारदर्शक पणे राबवली जाते. योग्य दिशा मध्ये कष्ट घेत राहील तर निश्चित यश भेटू शकत असे मनोगत मोहसिन ने व्यक्त केले.

MPSC राज्यसेवा मध्ये मोहसिन ला यश मिळाल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *