
वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने आष्टी मधल्या जिल्हा परिषद शाळेत आणि मदरश्यात स्वयंपाक मदतनीस म्हणून तसेच हाताला मिळेल ते काम करुन आपल्या लेकीचे शिक्षण पूर्ण केले.
आईने सोसलेल्या कष्टाची जाणीव ठेवून उजमाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. ध्येय निश्चित असलं की अडचणींचा त्रास होत नाही असं म्हणतात हे उजमा ने खरं करून दाखवलं.
तब्बल ५ वर्षांच्या खडतर संघर्षात अभ्यासासाठी घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने उजमाने आंघोळीच्या बाथरूमलाच लायब्ररी करुन आज नेत्रदीपक यश मिळवलंय.
PSI उजमा शेख यांच्या या यशात कायम भक्कमपणे उभी राहिलेल्या तिच्या आईला जेवढा आज आनंद आणि अभिमान वाटतं असेल तेवढा आनंद आणि अभिमान संपूर्ण आष्टी तालुक्याला वाटतोय.
उजमाची ही संघर्षमय यशोगाथा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असेल..