मुस्लिम समाजाला महाराष्ट्रात आरक्षण प्रवर्गाचा मिळणारा लाभ.

महाराष्ट्रात मुस्लिमांच्या 84 जाती ह्या विविध आरक्षण लाभार्थी आहेत.महाराष्ट्र शासनाने इतर मागास प्रवर्गातील मुस्लिम समाजाच्या विविध जातींचा समावेश होतो. मुस्लिम समाजाला मिळणारा लाभ हा व्यवसायाच्या आधारे मिळतो . तसेच मुस्लिम समाजाचा बलुतेदारीशी असलेला संबंध. पण व्यवसायाच्या आधारे जातीचा उल्लेख जुन्या कागदपत्रात जे शासनाने विहित केले आहेत त्यात असावा.

अनुसूचित जाती SC मध्ये एक पण मुस्लिम जात नाही.

अनुसूचित जमाती ST मध्ये जे आदिवासी जिल्हे आहेत तिथल्या मुस्लिमांना प्रवर्गातील आरक्षण मिळते उदा तडवी.

इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC मध्ये येणाऱ्या मुस्लिम जाती.

१) नं. ४ मुस्लिम मांड
२) नं ३० ढोली हश्मी/
डफली
३)नं ५६ जोहारी
४)नं ५७ जुलाहा, अन्सारी
५)न. ९० नदाफ, मन्सुरी
६)न. १०८ न्हावी (सलमानी, हजाम) हज्जाम, सलमानियाँ
७)न. १११ नक्काशी
८)नं. १२६ पटवेगार, पटवेकरी
९)नं १३५ रंग्रेज,रंगरेज (भावसार, रंगारी) पटके व्यावसायिक
१०) नं. १५३ इद्रिसी/दर्जी (टेलर)
११) नं. १५५ तांडेल (कोकण)
१२) नं. १७७ पिंजारा, पिंजारी, मन्सूरी
१३) न. १८२ बागवान (मुस्लिम धर्मीय माळी)
१४)न. १८७ भटीयारा (मुस्लिम धर्मिय)
१५)न.१९१ मोमीन, अन्सारी
१६)नं. १९२ फकीर बंदराला
१७) न. १९५ तांबोळी (मुस्लिम धर्मीय पानफरोश)
१८) नं. २०२ अत्तार, अतार
१९) न. २३६ दर्जी
२०) न. २५१ बुनकर
२१) नं. २५४ लाड
२२) न. २५७ कसाई, कसाब, कुरेशी
२३) न. २७६ इजाम, नाई
२४) न. २८४ पिंजारी (नदाफ)
२५)३१६ खटिक, कुरेशी खाटिक, कसाई
२६) न. ३२७ पहाड / पहाडी
२७) नं. ३२८ गडरिया (मुस्लिम मेंढपाळ)
२८)नं. ३२९मच्छिमार(दाल्दी)
२९) न. ३३० भालदार
३०) नं. ३३२ पेंढारी
३१) न. ३३४ महात/माहूत/ महावत
३२) नं. ३३५ फकीर
३३) न. ३३७ नालबंद
३४) नं. ३३९ मुजावर
३५) न. ३४० मुलाणा, मुलाणी, मुलाणे
३६) न.३४४ मस्लिम धर्मिय काकर
३७) न.३०९ मनियार,मन्यार, मनेर या जाती आहेत.
३८) न.१८१:- तेली मुस्लीम. ३९) न.१२७ फुलारी PHULARI CAST at sr.no 127 OBC under Govt.Resolution no CBC/1467 दी १३/१०/१९६७

SBC विशेष मागास प्रवर्गात येणाऱ्या मुस्लिम जाती

SBC मध्ये एकूण 7 जातींचा समावेश आहे. त्यातील 7 नंबरला मुस्लिम भंगी, मेहतर, लालबेग, हलालखोर आणि खाकरोब या जातींना आरक्षण आहे.

विमुक्त जाती VJNT (A)

VJNT अ मध्ये 14 जातींचा समावेश असून 14 व्या क्रमांकावर मुस्लिम समाजातील छप्परबंद या जातीला यातून आरक्षण दिलेले आहे.

भटक्या जमाती- (ब ) NT (B)

NT ब मध्ये मुस्लिम समाजातील , क्रमांक २ बेलदार, क्रमांक ७ सापगारुडी, क्रमांक २१ शिकलगार, मुस्लिम मदारी, सापवाले, गारुडी, जादूगर, मुस्लिम गवळी, दरवेशी, वाघवाले आणि अस्वलवाले , घिसाडी बावा यांना आरक्षण देण्यात आलेले आहे.

भटक्या जमाती NT (क )आणि भटक्या जमाती NT (ड) मध्ये फक्त धनगर आणि वंजारी या दोन जातींना 5.5% आरक्षण आहे. या वर्गात मुस्लिम समाजातील कोणत्याही वर्गाचा समावेश होत नाही.

ज्या मुस्लिम समाजाच्या जातींचा किंवा व्यक्तींचा आरक्षण प्रवर्गात समाविष्ट होत नाही त्यांनी EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ नक्की घ्यावा.

6 thoughts on “मुस्लिम समाजाला महाराष्ट्रात आरक्षण प्रवर्गाचा मिळणारा लाभ.

  1. मराठी मुस्लिम या ग्रुप वरती मुस्लिम समाजाला जाग्रत करण्याचे काम आपण करत आहात हे फार मोठे कायँ असून अल्लाह आपल्याला अशीच सुबुद्धी देओ आपल्या हातून असेच काय व्हावे हि अल्लाह जवळ प्राथँना

  2. अमचे कास्ट सर्टिफिकेट आहे NT
    पैन लाभ काय नाही मिळत
    नाईकवाडे सर नेम आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *