
महाराष्ट्र शासनाच्यावतीने आरोग्य विभागाच्या औषध निर्माण अधिकारी परीक्षा घेण्यात आलेली होती.
फार्मसी ऑफिसर परीक्षा, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 21565 उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ज्यामध्ये शेख जुबेर सगीर अहमद (शहादा) नंदुरबार यांनी या परीक्षेत 14 वा क्रमांक आणि आरोग्य विभाग-नाशिक विभागात 6 वा क्रमांक मिळवला.
त्यांची औषध निर्माण अधिकारी (फार्मसी अधिकारी-) आरोग्य नाशिक विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जर उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर उमेदवाराकडे औषध निर्माण शास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे तरच उमेदवार आला या पदासाठी अर्ज करता येतो.
महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्य विभागात, आरोग्य मंत्रालय, महानगरपालिका दवाखाने, जिल्हा परिषद यासारख्या विभागात हे पद असते.
जुबेर यांच्या निवडीने कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
Assalamu alaikum