शब ए मेराज

इस्लाममध्ये शब-ए-मेराजला विशेष महत्त्व आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार दरवर्षी रजब महिन्याच्या २७ तारखेला हा सण साजरा केला जातो. रजब महिन्याच्या २७ तारखेला पैगंबर-ए-इस्लाम (अल्लाहचे प्रेषित) हजरत मुहम्मद मुस्तफाﷺ आणि अल्लाह यांची भेट झाली. म्हणूनच या रात्रीला ‘पाक रात’ असेही म्हणतात.

शब-ए-मेराज हा अरबी शब्द आहे. वास्तविक अरबी भाषेत शब म्हणजे रात्र आणि मेराज म्हणजे आकाश۔असे मानले जाते की या रात्री हजरत मुहम्मद मुस्तफाﷺ यांनी सौदी अरेबियातील मक्का शहरातून जेरुसलेममधील बैत अल-मुकद्दुस मशिदीपर्यंत प्रवास केला होता.
मग त्यांनी सात आकाशात प्रवास केला आणि शेवटी तो अल्लाहला सिदरत-ए-मुंताहा येथे भेटले (ज्यापर्यंत पैगंबर-ए-इस्लाम सोडून कोणीही मानव किंवा अवतार जाऊ शकत नाही). तेव्हापासून या खास दिवशी शब-ए-मेराज साजरी केली जाऊ लागली.

इस्लाममध्ये शब-ए-मेराजचे महत्त्व

इस्लाममध्ये शब-ए-मेराजची रात्र खूप महत्त्वाची आहे. या दिवशी उपवास करणार्‍याला मोठे पुण्य मिळते असे म्हणतात जो व्यक्ती या रात्री अल्लाहची उपासना करतो आणि कुरआनचे पठण करतो,त्याला अनेक रात्री नमाज अदा करण्याइतकेच फळ मिळते असे हदीस च्या संदर्भ सहित मौलवी लोक सांगतात.
या रात्री विशेष प्रार्थना,नमाज पठण आणि पैगंबरावर दुरूद (सलाम) केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *