सांगलीचे सरफराज आणि साजिद दोघेही शासकीय सेवेत रुजू

मूळचे भिलवडी पलूस सांगली येथील शौकत संदे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. लहानपणी मोलमजुरी करून दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरच्या गरीब परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आले नाही शिक्षण कसे बसे पूर्ण करून शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे शिक्षणात पुढे जावे हि गोष्ट ध्यानात घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी मुलांची सोय केली .

एका मुलीला E&TC Engineer
एक मुलगा Mechanical Engineer तर दुसरा लहान भाऊ Bachelor of Pharmacy पर्यंत शिक्षित केले.मुला- मुलींचे शिक्षण हीच त्यांची खरी गुंतवणुक त्यांनी मानली.

मोठा मुलगा सरफराज शौकत संदे याची नुकतीच 1)कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग, पुणे
2) महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड क्लार्क या दोन पदावर नियुक्ती झाली असून लहान भाऊ साजिद शौकत संदे यांची औषध निर्माण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली येथे नियुक्ती झाली आहे.

सरफराज आणि साजिद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असून अजून पुढे अभ्यास सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद असून समाजातून आनंद व्यक्त होत आहे.

3 thoughts on “सांगलीचे सरफराज आणि साजिद दोघेही शासकीय सेवेत रुजू

  1. In did it’s grate pleasure to know the achivment.both brothers and perents deserve for the achivment.
    Keep it up congratulations May Allah bless you with all the success and happiness in the world
    Mulla sir and family kadegaon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *