उर्दू माध्यमाच्या शाळेवर इतर माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती करू नये.

पवित्र पोर्टलमध्ये पदवीधर शिक्षक विषय शिक्षक म्हणून उर्दू माध्यमाच्या शाळावर इतर माध्यमाचे उमेदवारांना दिलेले आदेश रद्द करून उर्दू शाळावर शासन निर्णयानुसार फक्त उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनाच प्राथमिक/विषय शिक्षक म्हणून नियुक्ती करण्या बाबतची मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना राज्याचे राज्य अध्यक्ष एम ए गफार यांनी मा मुख्यमंत्री राज्याचे मा उप मुख्यमंत्री,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, राज्याचे प्रधान शिक्षण सचिव,शिक्षण आयुक्त पुणे यांना वारंवार नियमितपणे मेलद्वारे निवेदने देऊन विनंती केलेली आहे तथापि हे आदेश रद्द न झाल्यामुळे राज्य अध्यक्ष एम ए गफ्फार मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे. सध्या राज्यात पवित्र पोर्टल द्वारे पात्र उमेदवारांना शिक्षण सेवक या पदासाठी नियुक्ती आदेश निर्गमित होणार असल्यामुळे संघटनेचे राज्य प्रवक्ता श्री जव्वाद हुसेन यांच्या प्रयत्नामुळे अकोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता श्री बद्रूजमा यांच्या मार्फत दिनांक 6 मार्च 2024 रोजी माजी राज्यमंत्री मा. श्री बाबा सिद्दिकी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या शिष्ट मंडळाची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजित दादा पवार यांच्या शासकीय निवस्थानी देवगिरी मुंबई येथे झाली. या बैठकीत उर्दू शिक्षक व उर्दू शाळांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उर्दू शाळावर इंग्रजी किंवा मराठी माध्यमाचे शिक्षक दिल्यास उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार यासाठी ज्या माध्यमाची शाळा त्याच माध्यमाच्या शिक्षक देण्यात यावे ते शासन निर्णयाच्या विरुद्ध असल्यामुळे उर्दू शाळावर फक्त उर्दू माध्यमाचे शिक्षकांची नियुक्ती करावी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यामुळे मा. ना.श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त मा. श्री सुरज मांढरे साहेब (भा.प्र. से) यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना स्पष्ट आदेश दिले आहे की उर्दू शाळावर फक्त उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात यावी इतर माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये असे आदेश मा.शिक्षण आयुक्त यांना दिले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मा.श्री. प्रफुल पटेल महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री ताजुद्दीन अ.गफूर परकार, कोकण विभागीय उपाध्यक्ष श्री बशीर परकार, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री शेख जैनुलआबेदिन, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री अकलाख गोडमे, रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष श्री.अस्लम खान व इतर पदाधिकारी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *