मुस्लिमांनी बिनशर्त पाठिंबा देण्यापेक्षा खालील प्रश्न विचारावेत

जे लोकसभा उमेदवार प्रचारासाठी येतील त्यांना खालील प्रश्न आवश्य विचारा.


(1) आपण केंद्र व राज्य सरकारमधील अल्पसंख्याक विकास विभागाचे बजेट व नव्या आवश्यक योजना निर्मितीसाठी काय करणार ?

(2) गेली 2 वर्षे केंद्र सरकारने अल्पसंख्याक विभागाचे बजेट 2000 कोटी रु.ने कमी केले. ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार?

3) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक विभागाच्या स्काॕलरशिप बंद केल्या यावर आपण व आपल्या पक्षाने सरकारला कोणते प्रश्न विचारले? ते सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करणार? ज्यामुळे प्राथमिक.माध्यमिक,महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी गळती वाढली आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील?

4)अल्पसंख्याक हक्क दिन कधी असतो? आपल्या राजकीय जीवनात ह्या दिननिमित्त आपण कधी कार्यक्रमात सहभागी होवुन अल्पसंख्याकांचे समस्यावर शासनाकडे काय मागण्या केल्या का?

5) पंतप्रधान 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम व सरकारी योजना अल्पसंख्याकापर्यंत पोहचवण्यासाठी आपण काय काम केले?

6) धर्माप्रमाणे प्रार्थना करणे हा संविधानीक अधिकार असताना अनेक वर्षापासुन नवीन मस्जिद, दर्गाह निर्मितीचे /दुरुस्तीसाठी परवानगी कडक निर्बंध लावुन अल्पसंख्याक धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे, या समस्येवर उपाययोजना करणेसाठी आपण काय प्रयत्न करणार?

7) आता मस्जीदीवर हेतुपुर्वक बुलडोजर फिरवुन समाजात अशांतता पसरवण्याचे काम चालु आहे, यावर संविधानीक हक्क, अधिकार, स्वातंत्र्यासाठी आपली भूमिका काय असेल?

8) सरकारने प्रत्येक शासन योजना, निधीमध्ये 15% निधी अल्पसंख्याकासाठी असे धोरण असलेला शासन निर्णय केला पण त्याच्या वर काम केले नाही व सध्या तर असा निर्णय रद्द करणेत आला आहे. तर पुनश्च अशा आरक्षित निधीसाठी आपण काय प्रयत्न करणार?

9) काँग्रेसच्या काळातील राज्यातील पहीला माँबलिंचींग मृत मोहसीन शेख पासुन नुकताच पूसेसावळी ,सातारा. व इतर शहर गावामधील दंगलीत मृत झालेल्यांना आणि नुर हसन यांचे वारसांना शासनाने 1रु ची ही मदद दिलेली नाही. तसेच दंगलग्रस्त दुकानदारांना सुद्धा कसलीही मदद मिळाली नाही. या प्रकरणात आपण शासनाशी काय पत्रव्यवहार तरी केला काय ?

10) कित्येक वर्षे अल्पसंख्याक आयोग, मौलाना आझाद महामंडळ, जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समित्यावर अशासकिय सदस्य, चेअरमन यांचे नियुक्त्या केल्या नाहीत.
यावर आपण किंवा आपल्या पक्षाकडून काय प्रयत्न करणार ?

11)अल्पसंख्याक विकास विभाग, केंद्र व राज्याचे बजेट बाबत मोठा अन्याय समाजावर होतोय. यावर कधीही आपण किंवा आपल्या पक्षाची भूमिका काय असेल?
तसेच हे तोकडे बजेट पण खर्च केले जात नाही. अधिकारी वर्गाकडून तो परत पाठवला जातो किंवा ते उदासीन असतात.समाजाला विकासा पासुन वंचीत ठेवण्याचे काम होतेय याबाबत आपली भूमिका काय असेल ?

12) हिजाबबंदी तसेच अन्य धार्मिक मुद्द्यावर हस्तक्षेप करून अल्पसंख्याक समाजाच्या संविधानीक हक्कावर गदा आणली जात असताना आपली भुमीका स्पष्ट करा ?

13) मुस्लीम द्वेषाने जातीयवादाला खतपाणी घालत जाहीर भाषणे होत असताना आपली भूमीका स्पष्ट का नाही? जातीयवादी व हेट स्पीच देणाऱ्यावर तसेच मस्जिदीवर तसेच मुस्लिम व्यवासायिकावर होणाऱ्या हल्ल्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी आपण किंवा आपला पक्ष यांची भुमिका काय होती? व पुढे कोणती भूमिका घेणार?

14) मुस्लीमांचे शिक्षण, संरक्षण, व आरक्षण बाबत आपली भुमिका काय असेल व याबाबत मूस्लिमांना न्याय देणेसाठी आपण काय करणार?

4 thoughts on “मुस्लिमांनी बिनशर्त पाठिंबा देण्यापेक्षा खालील प्रश्न विचारावेत

  1. It’s really answered by the political parties
    I think that they may publish how many Muslim women get justice by imposing ban on triple talak before and after ban statistics should be published.

  2. Asking such questions to MP candidates or availing unconditional support to any of the parties will not solve our purposes / pains unless we correct ourselves on grass root level. We must first ask following questions to our Non-political or political leaders,
    1) What is the purpose of Waqf-board ?
    2)What waqf-board is doing for upliftment of minorities ?
    3)Where waqf board is utilizing their funds/money ? Waqf board is having ownership of most land after railway / Defence 4)Why our scholars / preachers are afraid of talking of atrocities against muslims ?
    5)why our scholars / preachers never takes stands & protest against any illigal activities is being done with muslims 6)Why Muslim scholars / preacher never announce from platform of Ijtema / masjid to protest against any illigal activities against muslims ? 7)Muslims have great platform where most of the peoples gathers ( daily namaz / Friday prayers etc ) that platform can be used to show our strength in democratic way to protest against any illigal activities, our scholars / preachers are just killing the time on talking only on life-hereafter ! 8) There are hundreds of points which we ourselves first needs to correct it then only we can blame politics or politicians. We all muslims are mostly miss-leaded by our own scholars / preachers. Most of the powerfull leaders / preachers / institutions of muslims are being only interested in money making & limiting the Muslim peoples upto 5 times a day namaz & stories of hereafter. Muslims are purposely being weaken by our preachers / scholars. We muslims should fight in a democratic way because we are second largest population in India but we are being treated like cockroaches due to our impotent scholars / preachers / leaders. ” CAA / NRC was big thing which is being targeted only towards muslims but have you ever heard from any preachers / scholars from platform of masjid / Ijtema guiding our peoples, lets show our strength in democratic way to the government ! ” Just conducting ijtema/ programmes / pushing the peoples peoples to here & there will not solve any purpose.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *