मोहम्मद पैगंबर (स.स ) म्हणतात, “कामगारांना त्यांच्या मेहनतीमुळे येणारा घाम सुखण्याआगोदर त्यांचे वेतन दया. “

मोहम्मद पैगंबर (स.स ) म्हणतात, “कामगारांना त्यांच्या मेहनतीमुळे येणारा घाम सुखण्याआगोदर त्यांचे वेतन दया. “

“अल्लाह त्या माणसाशी वैर करील ज्याने मजुराला कामाला लावले, काम करून घेतले व नंतर मजुरी दिली नाही ” (संदर्भ हदिस: बुखारी शरीफ २२२७, इबने माजा २४४२)

तुमचे नोकर चाकर हे तुमचे बंधू आहेत . तुम्ही जे खाता ते त्यांनाही द्या तुम्ही जे परिधान करता ते त्यांनाही द्या.”
(संदर्भ बुखारी शरीफ ६०५, इबने माजा ३६९०, मुस्लिम शरीफ १६६१)

खालिफा यांचे कामगार विषयक मत

इस्लामिक शासन व्यवस्थेमध्ये खलीफा ही सर्वोच्च शक्ती होती. संपूर्ण सरकारवर त्यांचे नियंत्रण असायचे.

हजरत अबू बकर सिद्दीक हे मुस्लिम धर्मियांचे पहिले खलीफा झाले तेव्हा खलिफाचा पगार किती असावा हा मुद्दा पुढे आला.

सय्यदीना अबू बकर यांनी यावेळी मदिनामधील मजुराचा पगार किती आहे? हे शोधून काढले.

त्यांनी स्वत:साठी कामगाराप्रमाणेच वेतन निश्चित केले आहे. इतर साहबा(पैगंबरांचे सोबती ) म्हणाले की,

“एवढ्या कमी वेतनात कसे जगणार?”

अमीरुल मोमिनेन अबू बकर सिद्दिक म्हणाले की, माझे आयुष्य मजुरांसारखेच असेल. जर मी जगू शकलो नाही, तर मी कामगाराचे वेतन वाढवीन आणि नंतर माझे स्टायपेंड देखील वाढवीन. कामगाराचे वेतन वाढल्याने माझे राहणीमानही चांगले होईल.

ज्या दिवशी जगात असे घडले की पंतप्रधान/राष्ट्रपतींचा पगार कामगाराच्या बरोबरीने होईल, त्या दिवशी भांडवलशाहीला चपराक असेल. आज किती आमदार खासदार स्वतःची पेंशन सोडायला तयार आहेत. एकीकडे कामगारांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता बंद आहे तर लोकप्रतिनिधीच्या पेन्शनी सुरु आहेत.

जसं जशी भांडवलशाहीचा बकासुर वाढतोय तस तसा कामगार अधिक पिचला जातोय.

#1_मेकामगारदिन

2 thoughts on “मोहम्मद पैगंबर (स.स ) म्हणतात, “कामगारांना त्यांच्या मेहनतीमुळे येणारा घाम सुखण्याआगोदर त्यांचे वेतन दया. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *