
मुस्लिम लीडरशिप
Muslim Leadership :-
ज्या ज्या वेळी अन्याय येतो त्या त्या वेळी हा प्रश्न चर्चेला येतो. पण मुस्लिम समाज यावर काम करतो का? विविध पक्षाकडून मुस्लिम समाजावर जे लीडर लादले जातात त्यांना नैतिक अधिष्ठान असते का?
गुंड प्रवृत्तीचे, जुगार गांजा विकणारे , दोन नंबर धंदे असणारे मुस्लिम बहुल भागात मुस्लिम नेतृत्व म्हणून लादले जातात. एरवी मस्जिदच्या मेंबरवरून हराम हलाल करणारे मौलाना काही अंशी यांचे पाठीराखे म्हणून राजकीय कार्यक्रमात गर्दी जमावताना दिसतात. यातील काहींची समाजाबद्दल तळमळ असते परंतू ज्यावेळी हे मुस्लिम राजकारणाला एक दिशा देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा यांना प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला दाबून ठेवणे सोप्पे जाते.
दुसरी गोष्ट मुस्लिमांची मानसिकता. कोणाचे कुणाबरोबर फोटो आहेत. कौन कुणाच्या बर्थ डेला जास्त जातो. शिरखुर्मा, इफ्तार याला कुणाच्या घरी राजकीय पुढारी जातो त्याला भाव देणारे मुसलमान जास्त असतात पण अशा वेळी समाजात प्रामाणिक काम करणारे बहुसंख्य जण आहेत त्यांना ना सामाजिक ताकद मिळते ना सामाजिक बळ मिळते.
सध्याच्या काळात राजकीय ताकद उभी राहायची असेल तर समाजातील सर्व घटकांची आर्थिक ताकद त्यामागे उभे राहणे गरजेचे आहे जी वंचित बहुजन आघाडी, जरांगे पाटील यांच्यामागे उभी राहिलेली दिसेल.
मुस्लिम लीडरशिपचा मार्ग बहुंख्याक लोकशाहीत अल्पसंख्याकसाठी खरचं सोप्पा आहे का?
मुस्लिम लीडरशिप शक्य आहे पण त्यासाठी नेतृत्व प्रामाणिक असायला हवे,आणि त्यात सातत्य असायला हवं, कृतीतून समाजाचे प्रती असलेली कणव त्यातून जाणवली तर समाज अशा नेतृत्वाच्या मागे निश्चित जाईल.