
मुस्लिम येशू ख्रिस्तांना मानतात म्हटल्यावर अनेक मुस्लिमेत्तर बांधवांना आश्चर्याचा धक्का बसतो. परंतु हे सत्य आहे. मुस्लिम येशू ख्रिस्तांना मानतात कारण, त्यांना मानणे मुस्लिम असण्याची पूर्वअट आहे. येशू ख्रिस्तांना अल्लाहचा प्रेषित मानल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही.
हजरत इसा अलैहिस्सलाम:-
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना ख्रिश्चन म्हणतात, ख्रिश्चनांचा येशू ख्रिस्त आणि मुस्लिमांचा हजरत इसा अलैहिस्सलाम हे ज्यू मातेच्या पोटातून जन्माला आले होते (इस्लामच्या मान्यते नुसार इमानवंत आईच्या पोटी) , ज्यांना ख्रिश्चन “मेरी” म्हणतात आणि मुस्लिम त्यांना “हजरत मरियम” म्हणतात.
हजरत मरियम हया एकमेव महिला आहे ज्यांचा कुराणात उल्लेख आहे आणि त्यांचा उल्लेख केवळ तीन वेळा नाही तर कुराणमध्ये हजरत मरियमवर एक संपूर्ण अध्याय आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की कुराणावर आधारित इस्लाम हा या जगात एकमेव असा धर्म आहे जो पूर्वीच्या सर्व धर्मांना आणि त्यांच्या महापुरुषांना प्रमाणित करतो आणि मान्यता देतो. काही नावाने तर काही नावाशिवाय.
इस्लाम ख्रिश्चनांचे मूळ धार्मिक पुस्तक बायबल, शब्दशः स्वीकारतो. आणि कुराणानुसार, ते अक्षरशः चार इस्लामिक पुस्तकांसह “कुराण”, येशू ख्रिस्तांना प्रकट केलेले “इंजील”, हजरत मुसा अलैहिस्सलाम यांना प्रकट केलेले “तौरात” आणि हजरत दाऊद अलैहिस्सलाम यांना प्रकट केलेले “जबूर” यांची ओळख करुन देते.
“बायबल” हे खरेतर “गॉस्पेल” चे सुधारित रूप आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या ख्रिश्चन विश्वासांनुसार नंतर अनेक कथा जोडल्या गेल्या.
आज 25 डिसेंबर, हजरत इसा अलैहिस्सलाम यांचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते. इस्लामच्या मान्यतेनुसार ते ईश्वराचे संदेशवाहक आहेत.
"हजरत इसा ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला, त्या दिवशी शांति असो, जोपर्यंत ते या जगात राहिले तोपर्यंत त्यांच्यावर शांती असो, आणि ज्या दिवशी ईश्वर त्यांना आणि जगातील सर्व लोकांना एकत्र करील त्या दिवशी त्यांच्यावर शांति असो! "
कुरआनमध्ये हजरत ईसा म्हणजेच प्रेषित येशूंचा उल्लेख किमान २५ वेळा आला आहे. इतकेच नाही तर प्रेषित येशू यांच्या माता, माता मरयम यांच्या नावाने कुरआनमध्ये एक स्वतंत्र प्रकरणही आहे.
ईसा हे येशूंचा अरबी उच्चारण. येशू मराठी उच्चारण. मुस्लिम समाजात ईसा नावाची शेकडो, हजारो नव्हे तर लाखो माणसं सापडतात. अनेक लोक आजही आपल्या नवजात मुलांची नावं अत्यंत आदरभावानं ईसा ठेवतात. हे केवळ प्रेषित ईसा यांच्या बाबतीतच आहे असे नव्हे. प्रेषित ईसा यांच्या माता, माता मरयम यांच्या नावावर असंख्य मुस्लिम जोडपी त्यांच्या मुलींचे नाव मरयम ठेवतात.
प्रेषित येशूंना चुकून ख्रिस्ती धर्माचा संस्थापक समजण्याची चूक झाली असली तरी मुस्लिम समाज आणि इस्लामचा त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत उदार आहे. ज्यू धर्माचे संस्थापक मानले गेलेले मोशे (मूसा) यांच्या बाबतही मुस्लिमांचे धोरण हेच आहे. प्रेषित मोशे पूर्वीच्या समस्त इस्रायली प्रेषितांबाबत मुस्लिमांचा दृष्टिकोन अत्यंत उदार आहे. अब्राहाम, इसहाक, इस्माईल, याकूब, जोसेफ, जॉन या सर्वांचा उल्लेख कुरआनमध्ये अत्यंत आदरयुक्त शब्दांत आला आहे. यांच्यापैकी एकालाही कमी लेखणारी किंवा नाकारणारी व्यक्ती मुस्लिम असू शकत नाही, असे कुरआनमध्ये मांडण्यात आले आहे. मुस्लिम प्रेषित येशूंचा उल्लेखही तितक्याच आदरभावने करतात, जितका प्रेषित मुहम्मद यांचा करतात.
प्रेषित येशू यांच्या माता, माता मरयम यांचा उल्लेख कुरआनने ज्या गौरवशाली शब्दांत केला आहे, वास्तव आहे की यासाठी जागतिक ख्रिस्ती समाजाने कुरआनचे ऋणी असणे अनिवार्य आहे. कारण की, ख्रिस्तांच्या बायबल अर्थात नवा करारात लुकाच्या वर्तमानाचा अपवादात्मक उल्लेख वगळता – माता मरयम यांचे गौरव आणि आदर करणे लांबची गोष्ट; साधारण वर्णन करणारे एक वाक्य शोधूनही सापडत नाही. पास्टर आणि फादर यांना यामागचे कारण विचारले, तर याचे उत्तर भेटनार नाही. उलट कुरआनमधील मरयम यांचा उल्लेख वाचून अनेक ख्रिस्तीचे डोळे पाणावतात.
येशू ख्रिस्त ज्यू होते, आणि त्यांना ज्यूंनी छळले, क्रूसावर खिळे मारले हे व त्यांना मारले पण इस्लामच्या मान्यता याबाबत वेगळ्या आहेत.
ख्रिश्चन हिटलरच्या ज्यूंवर चिडण्याचे कारण होते.
पण आज ख्रिश्चन आणि ज्यू एक आहेत, जे ज्यू आणि ख्रिश्चनांच्या धार्मिक पुस्तकांना स्वतःचे म्हणवून घेणारे आणि त्यांच्या धार्मिक महापुरुषांना पैगंबर म्हणून स्वीकारणार्या मुस्लिमांवर एकत्रितपणे अत्याचार करत आहेत.
यावरून असे दिसून येते की राजकीय कट्टरतावाद अधिक विकृत आणि घृणास्पद आहे आणि तो धार्मिक मूलतत्त्ववादापेक्षा जास्त आहे.
आज ख्रिसमस निमित्त हे आठवण्याचे कारण म्हणजे ख्रिसमस आणि येशूंचा जन्माचा काहीच संबंध नाही. ख्रिसमस हा येशूंचा शिकवणीत बाह्य प्रक्षेप आहे, ज्यावर आता कोठे ख्रिस्ती विद्वान हळू का होईना, परंतु बोलू लागले आहे. आणि हो, येशू ख्रिस्तांच्या शिकवणी जाणून घेण्यासाठी आयुष्यातून किमान एकदा कुरआनचा अभ्यास जरूर करावा.
लेखक – मुजाहिद शेख, औरंगाबाद.(इस्लाम धर्माचे अभ्यासक)
अतिशय सोप्या भाषेत वर्णन केले आहे .