डॉ. झैनब शेख पटेल: स्वप्न, मेहनत आणि कुटुंबाच्या साथीची यशोगाथा.

अहमदनगर सध्याचे अहिल्यानगरसारख्या एका छोट्या शहरात राहणारी झैनब ही एक सामान्य मुलगी, पण तिची स्वप्ने असामान्य होती. लहानपणापासून तिला डॉक्टर बनायचे होते, लोकांचे दुखणे कमी करायचे होते. मेहनती आणि जिद्दीच्या जोरावर तिने एमबीबीएस पूर्ण केले. पण तिचा प्रवास येथेच थांबला नाही.एमबीबीएस नंतर झैनबने लग्न केले आणि तिला एक गोंडस बाळ झाले. बऱ्याच जणांना वाटले की आता तिची करिअरची स्वप्ने मागे पडतील. पण झैनबने ठरवले की ती थांबणार नाही. तिच्या दीड वर्षाच्या बाळाला सांभाळत तिने जनरल सर्जरीमध्ये एमएस (मास्टर्स ऑफ सर्जरी) मध्ये प्रवेश घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. तीन वर्षांचा कठीण अभ्यास, रुग्णालयातील लांबलचक ड्युटी आणि बाळाची जबाबदारी – हे सगळे एकाच वेळी सांभाळणे म्हणजे खरे आव्हान होते.पण ती थांबली नाही खालील कुराणचा संदेश प्रमाण मानून तीने पुढील वाटचाल सुरू ठेवली.“जेव्हा तू एक काम पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्या कामासाठी मेहनत कर आणि आपल्या रब्बकडे झुक.” (94:7-8).पण झैनब एकटी नव्हती. तिच्या यशामागे तिच्या कुटुंबाची खंबीर साथ होती. तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि आई-वडिलांनी तिच्या बाळाची काळजी घेतली. तिचे पती, जे स्वतः एमबीबीएस, एमडी (मेडिसिन) आणि व्यस्त सल्लागार डॉक्टर आहेत, त्यांनी तिला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्या व्यस्त प्रॅक्टिस असूनही त्यांनी झैनबच्या स्वप्नांना पंख दिले. “तुझी स्वप्ने माझीही आहेत,” असे ते तिला नेहमी सांगायचे.या सर्वांच्या साथीने झैनबने अथक परिश्रम केले. रात्रीचा अभ्यास, दिवसभर रुग्णालय आणि बाळाला वेळ देणे – हे सगळे तिने कौशल्याने सांभाळले. “निश्चितच, प्रत्येक अडचणीसोबत सुलभता येते.” (94:5-6)तीन वर्षांच्या मेहनतीनंतर, जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा झैनबने केवळ एमएस, जनरल सर्जर पास केले नाही, तर ती तिच्या कॉलेजमध्ये प्रथम आली! ही फक्त तिची नाही, तर तिच्या कुटुंबाची आणि त्या प्रत्येक व्यक्तीची विजयगाथा होती ज्याने तिला आधार दिला.आज डॉ. झैनब शेख पटेल समाजातील मुलींसाठी एक प्रेरणास्थान आहे. ती दाखवून देते की लग्न, आईपण आणि करिअर यांचा मेळ घालता येऊ शकतो, जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि कुटुंबाची साथ असेल. आज डॉ. झैनब शेख पटेल समाजातील मुलींसाठी एक प्रेरणास्थान आहे. ती कुराणातील सूरह अल-मुजादिला (58:11) चा संदेश जिवंत करते: “अल्लाह त्यांना उंच करतो जे ज्ञान प्राप्त करतात.” जर तुमच्याकडे जिद्द, अल्लाहवरील विश्वास आणि कुटुंबाची साथ असेल. तिची कथा प्रत्येक मुलीला सांगते – “स्वप्ने मोठी पाहा, मेहनत करा आणि अल्लाहवर भरोसा ठेवा, कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकणार नाही!”

One thought on “डॉ. झैनब शेख पटेल: स्वप्न, मेहनत आणि कुटुंबाच्या साथीची यशोगाथा.

  1. Hats off to u beti Zainab.It is really very rare and unique example of yourself as far as muslim community is concerned.Your determination and efforts have really paid off.Many many congrats.
    I pray to the almighty to give u courage and sustenance to serve the humans and get lots of duas from the needy people.
    Many many good wishes to u for ur bright future.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *