कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यासाठी 10 हिंदुनी स्वतः ची घरे पेटवून दिली..!! सावध व्हा हिंदू ओबीसी व इतर बांधवांनो!! – प्रा. जावेद पाशा कुरैशी

युधिष्ठिर, राकेश, कानू उर्फ कप्तान, सोनू, मांगेराम, रिंकू, हरिओम, मनीष, ललित आणि करनपाल हे ते दहा लोक अपराधी आहेत, ज्यांना आजीवन कारावास सेशन जज श्वेता दीक्षित, हापूड कोर्ट यांनी दिली आहे! हे ते 10 आरोपी आहेत ज्यांनी हिंदुत्वाच्या हिंसक प्रचाराला बळी पडून मोहम्मद कासिम नावाच्या एका भारतीय नागरिकाला अत्यंत निर्मम, हिंसक पणे मारून टाकले!

13 में 2025 मंगळवार ला हापुड़ च्या Additional Sessions Judge Shweta Dixit यांच्या कोर्टाने या 10 आरोपींना “आजीवन कारावास” सुनावला! या 10 लोकांनी कासिम ला पेचकस आणि अन्य तीक्ष्ण वस्तूंनी तेव्हा पर्यंत घोपत राहिले जोपर्यंत तो अर्धमेला झाला नाही. त्यानंतर कासिम याचा मृत्यू झाला.

आधी पोलिस याला सर्वसाधारण हमरी – तुमरी चा साधारण केस सांगत राहिली, तसाच केस बनविण्यात आला! मात्र सुप्रीम कोर्ट च्या हस्तक्षेपा नंतर याला “मॉब लिंचिंग” च्या कलमान्वये नोंदविण्यात आला. लोकल पुलिस कोणत्याही परिस्थितीत या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत होती, हिंदुत्ववादी राजकीय दबाव कार्य करीत होते. परंतु याचे पुरावे आणि व्हिडिओ उपलब्ध आहे की जेव्हा आरोपी कासिम ला निर्दयीपणे मारीत होती, तेव्हा उत्तरप्रदेश पोलिस आरोपींना सुरक्षा प्रदान करीत होती!
पोलिस द्वारा घटनेच्या वेळेला आरोपींना सुरक्षा देण्याचा एक व्हिडिओ च्या आधारावर काही पुलिस कर्मचारी सस्पेंड झाले होते. पुढे या पोलिसांचे काय झाले माहीत नाही, मात्र हे 10 हिंदू भाऊ आजीवन कारावासात गेले!
जर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले नसते तर या 10 आरोपींना निष्पाप, निरपराध घोषित केल्या गेले असते, त्यांची मिरवणूक काढण्यात आली असती आणि पुढे यांनी किती निरपराध कासिम मारले असते कुणास ठाऊक!

ही घटना 18 जून, 2018 ला घडली, मात्र मॉबलिंचिंग ची FIR सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 4 नोवंबर 2018 ला नोंदविण्यात आली. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर पाच महिन्यांनी मॉब लिंचिंग च्या कलमाखाली केस नोंदविण्यात आली. या पाच महिन्यात प्रशासन, पुलिस आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत होती.
मृत कासिम कडून उपस्थित झालेले वकिलांपैकी एक सौतिक बनर्जी यांनी सांगितले की कासिम च्या परिवाराने कोर्टाला सांगितले की अपराध्यांना फाशी देऊ नका, आम्ही बदला घेऊ इच्छित नाही, मात्र आम्हाला न्याय मिळाला पाहिजे! आणि कोर्टाने सर्व आरोपींना आजन्म कारावास दिला.

PTI च्या स्त्रोताकडून मिळालेल्या या फोटोला लक्षपूर्वक पहा! या फोटोत जे युवक कासिम ला मारीत आहे, आणि पोलिस त्यांच्या समोर चालत आहे, यात सर्व बहुतेक 20 ते 25 वयोगटातील आहेत. होऊ शकते यांच्यातील कित्येक आपल्या घरातील एकुलता एक असू शकतो. होऊ शकते यांच्यातील अनेकांचे लहान लहान मुले बाळे असतील. या प्रमाणे पाहिले तर असे म्हणणे चुकीचे नसेल की धर्मांध हिंदुत्वाच्या राजकारणाने एका निरपराध मुस्लिम कासिम ला आणि या अपराधी 10 मुलांना त्यांच्या आई बापापासून, कुटुंबापासून हिरावुन घेतले! त्यांच्या बायका पोरांना, आईवडिलाना उघड्यावर पाडले! ज्या युवकांना आपल्या लेकरांना शिक्षित करून काहीतरी बनवायचे होते, ज्यांना आपल्या म्हातारी आईबाप पोसायची होती, जे आपले जीवन योग्य रित्या जगू शकले असते, ते आता आयुष्यभर तुरुंगात राहतील. एक निरपराध कासिमला हिंदुत्वाच्या घाणेरड्या, द्वेशी राजकारणाने मारले, बदल्यात आपल्याच 10 हिंदू युवकांचे आयुष्य, संसार बर्बाद करून टाकले! एक मुस्लिम कासिम मेला, 10 हिंदू आजीवन तुरुंगात गेले! हे हिंदू बांधव, कोण मजेत आणि सत्तेत आहे? विचार करा!
युधिष्ठिर, राकेश, कानू उर्फ कप्तान, सोनू, मांगेराम, रिंकू, हरिओम, मनीष, ललित व करनपाल हे केव्हातरी याचा शोध घेतील काय की ज्या हिंदुत्ववादी राजकारण्यांनी त्यांना एवढे मानसिक दृष्ट्या विकृत केले, त्यांची मुले कुठे आहेत? काय शिक्षण घेताहेत? त्यांची पोरे कसले आयुष्य जगताहेत? कसली तयारी करताहेत? काय हे 10 लोक कधी समजू शकतील की त्यांनी हिन्दुत्वाची राजनीति करणाऱ्यांच्या घरी उजेडासाठी स्वतः ची घरे कां जाळली??

10 आरोपींना शिक्षा मिळण्याची बातमी जिथे न्याय आणि न्यायालय, न्यायपालिका यावरील विश्वास जागविणारी आहे, तिथेच त्या 10 अपराधसिद्ध आरोपींचा विचार केला तर चिंताजनक आहे! हिंदुत्ववा दी राजकारणाने जी द्वेषाची, घृणेची शेती पिकविल्या जातेय, त्याची विषाक्त फळे पचविल्याने हे 10 हिंदू ज्यांना “हिंदुधर्म” म्हणजे काय हे नेमके माहीत नाही, अपराधी, खुनी झालेत! हिंदुत्वाच्या जहरी विषाक्त प्रचाराने असले अपराध सार्वजनिक तर केलेत, मात्र हे धर्म कार्य म्हणून लोकांच्या डोक्यात कोंबले! एक मुस्लिम निरपराध ज्याला “इस्लाम” देखील पूर्णपणे माहीत नाही, ज्याची गरजच त्याच्या कष्टकरी आयुष्यात नव्हती, तो मेला आणि हे 10 आयुष्यभरासाठी तुरुंगात गेले! आनंदी कोण आहे???

युधिष्ठिर, राकेश, कानू उर्फ कप्तान, सोनू, मांगेराम, रिंकू, हरिओम, मनीष, ललित आणि करनपाल यांना मिळालेल्या आजीवन कारावासाच्य शिक्षेतून सर्व हिंदू परिवारांनी हे शिकले पाहिजे की तुमची मुले धर्माच्या नावाने काय शिकत आहेत आणि कोण त्यांना काय शिकवतो आहे! अर्थात सर्व धर्मियांनी आपल्या मुलांना धर्माच्या अश्या शिकवणीपासून दूर ठेवणे पुढच्या आयुष्याचा आणि देशाच्या हिताचे आहे!
नेमके कोणते व्हिडिओ पहात आहेत, कोणत्या विचारधारेत गुरफटत आहेत, याची जबाबदारी पालकांची मोठी आहे!
दुःख आहे कासिम च्या परिवाराच्या बाबतीत… अत्यंत दुःख आहे 10 हिंदू परिवाराच्या बाबतीत! यांच्या टाळूवरील सत्तेची लोणी खाणारे मजेत आहेत!!

  • प्रा.जावेद पाशा कुरैशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *