
तैवानच्या नॅशनल चुंग सिंग विद्यापीठातील, ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स तर्फे २४ जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान ‘ग्लोबल समर स्कूल’ चे आयोजन करण्यात आले होते. या ‘समर स्कूल’ साठी मुंबई येथील नौशिन मोहम्मद साउद खान यांची मुंबई विद्यापीठाच्या 14 सदस्यीय संघात निवड झाली होती. विद्यापीठातून निवड झालेल्या 12 सार्वजनिक धोरण विषयात पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांपैकी नौशिन एक होती.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैवतंत्रज्ञान, शाश्वत प्रशासन आणि संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) या विषयांभोवती परिषदेची रचना करण्यात आली होती. यात विषयानुसार व्याख्याने, देशांच्या SDGs साध्य करण्यातील प्रगतीवरील प्रेझेन्टेशन, चर्चासत्रे, सांस्कृतिक देवाण-घेवाण, भविष्यातील सहकार्याच्या संधी आणि क्षेत्रभेटी यांचा समावेश होता. नौशिनने या परिषदेत ‘भारताच्या परिप्रेक्ष्यात कृत्रिम बुध्दिमत्ता धोरण’ या विषयावर भारताचे प्रतिनिधित्व केले.
नौशिनच्या या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐