आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी दिलेल्या आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा?

EWS – आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गात आरक्षण किती आहे आणि कौन लाभ घेऊ शकते.

या प्रवर्गात केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी 10% आरक्षण दिले आहे. जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग किंवा इतर कोणत्याही आरक्षित प्रवर्ग यांचा लाभ घेत नाहीत अशा सर्वांना EWS – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात. म्हणजे जी व्यक्ती SC/ST/OBC/VJNT/NT अशा आरक्षित प्रवर्गात येते त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

या दाखल्याची मुदत किती दिवस असते?

याची वैधता हि फक्त एक वर्षासाठी असते. प्रत्येक आर्थिक वर्षी हा दाखला नवीन काढावा लागतो.

ह्या दाखल्याचा लाभ कुणाला घेता येतो?

खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.
SC, ST, OBC आरक्षणातील लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.

कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना नोकरीत व शिक्षणात आरक्षण मिळू शकते.

आरक्षणासाठी पात्र व्यक्तीच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी.

१ हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं.

महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं.

गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट जागेची अट आहे.

यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?

लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.
लाभार्थी व त्यांच्या वडिलांची TC / निर्गम उतारा.
राशन कार्ड.
रहिवाशी प्रमाणपत्र.
उत्पन्नाचा पुरावा तहसीलदार यांचेकडून काढलेला उत्पन्नाचा दाखला (सातबारा, 8 अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा).
अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
स्वघोषणा पत्र.
विहित नमुन्यातील अर्ज.
3 पासपोर्ट फोटो.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अंतर्गत उमेदवारांना वयाच्या आणि परीक्षेत काही सूट आहे काय?

या प्रमाणपत्राच्या आधारे वयाच्या अटींमध्ये सुट नाही. तसेच परिक्षा फी मध्ये देखील सूट नाही परंतु दहा टक्के आरक्षित जागांचा फायदा घेऊ शकतात.

हे प्रमाणपत्र कुठे काढावे?

हे प्रमाणपत्र आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रात, सेतू कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात काढून मिळू शकते.

Read more: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी दिलेल्या आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा?

4 thoughts on “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्यासाठी दिलेल्या आरक्षणाचा लाभ कसा घ्यावा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *